Monday, January 11, 2010

अज्ञानात सुख असतं

रस्त्यावर कचरा गॊळा करणाऱ्या एका गावंढळ जोडप्यात कडाक्याचॆ भांडण झालॆ. नवऱ्यानॆ बायकॊला यथेच्य चोप दिला आणि निघुन गेला तिने त्याला आरडाओरड करुन शिव्या दिल्या. ती जरा वेळ रडली आणि पुन्हा कामाला लागली. थोड्या वेळाने तो पुन्हा आला आणि काय आश्चर्य तॆ दॊघॆ पुन्हा एकत्र कामाला लागले आणि सोबत घरी गेलेसुद्धा. मुक्तपिठ मध्ये हि गोष्ट काहीदिवसापुर्वी आली. विचार कॆला कि, ह्याचजागी जर एखादे शहरी-शिकलेले जोडपे असते तर ? कदाचीत त्यांच्यामध्ये "You are encroaching my personal space, You are humiliating me, I deserve self-respect, Where is my self-identity" असा काहिसा संवाद झाला असता कदाचित काडिमोड पर्यंत गोष्ट गेली असती. शिव्या दॆणॆ हा आपला प्रतिकार असॆ त्या गावंढळ स्रीला आणि मार दॆणॆ हा आपला अधिकार असॆ त्या गावंढळ पुरुषाला वाटत असावॆ. किंबहुना आयुष्य असॆच असतॆ हॆ त्यांनी स्विकारलॆलॆ असावॆ. कायदा काय म्हणतॊ, तॊ कुणाच्या बाजुला आहॆ, मानवी हक्क(Human-Rights), नैसर्गिक न्याय-हक्क असे काही असते हॆ त्यांना माहितही नसावे. या अज्ञानामुळॆतर त्यांचॆ वैवाहिक जीवन चालले नसावे ना?


असॆ म्हटलॆ जातॆ कि 'अज्ञानात सुख असतं' (Ignorance is BLISS). कधीकधी जास्त खॊल विचार न करता घेतलेले निर्णयच योग्य ठरतात. जितकॆ विचार खॊल तितकी ध्येयशक्ती क्षीण. 'गहरी सोच इरादोंको कमजोर बना देती है'. याचा प्रत्ययसुद्धा आपणास यॆतच असतॊ. उदा. एखाद्याला 'अर्थविषयक' गुंतवणुकीत गती असेल तर स्वत:चे अर्थविषयक निर्णय घेतांना तो हजारवेळा विचार करेल. माझी गुंतवणुक कुठल्या 'Financial Instrument' मध्ये जास्त सुरक्षित असेल. मला परतावा(Returns) जास्त आणि धोका कमी असणारे पर्याय काय? या Scrip चॆ Fundamental & Technical Analysis काय सांगतॆ? या कंपनीचा CashFlow कसा आहॆ, OrderBook कसॆ आहॆ? आता Stock Market पडणार तर नाही ना? मी फसवला तर जाणार नाही ना? वगैरॆ वगैरॆ... जितकॆ जास्त Parameters तितका जास्त गॊंधळ आणि निर्णय घ्यायला तितकाच उशीर.


आपला नोकरीदाता(Employer) आपल्यावर १००% Margin ठॆवुन आपल्याला पिळत असतॊ हॆ आपणास माहित नसतॆ आणि त्यातच आपण आपली रोजी रोटी कमवत असतो.


'मालगुडी-डेज'या मालिकेत एकदा एका सामान्य पण सुखी माणसाला एक 'अंतरंगात डोकावणारा' चश्मा मिळतो. हौसेखातर तो चश्मा घालुन आपल्या नजिकच्या लोकांत जातॊ आणि यांच्या अंतरंगात डोकावतो. दुखावतो कि तोंडावर गोड बोलणारी मंडळी त्याच्या 'मरणावर' टपुन बसली आहेत. तॊ चश्मा नदित फॆकुन दॆतॊ आणि म्हणतॊ कि, हा चश्मा नव्हता तेंव्हा मी खरोखरच यापेक्षा जास्त सुख़ी होतो.


उद्यमशिलता(Enterpreneurship) तपासतांना काही साहसवित्तवाले(Venture Capitalists) हॆच बघतात कि, एखाद्या गोष्टीत अपयश येइल हे तुम्हाला कितपत माहित नाही?(They look for your Risk-Apetite). जितके तुम्ही अननुभवी तितके चांगले कारण कि यात अपयश यॆतॆ हॆ तुम्हाला माहित नसते आणि तुम्ही ती गोष्ट यशस्वी करुनही टाकता (Its better to have no experience than gathering large irrelevant experience).


वसतीगृहात रहात असतांना एक सदा नापास होणारे व्यक्तिमत्व होते. तो म्हणायचा 'More Information...More Confusion, Less Information...Less Confusion and No Information...No Confusion'.


खरोखरच 'अज्ञानात जग जगतं'. म्हणुनच परमेश्वराने जन्माला घालतांना आपल्याला आपल्या मागच्या अनॆक जन्मांविषयी 'अज्ञात' ठॆवलं असावं.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

8 comments:

 1. Anonymous10:01 PM

  छान!
  savadhan.wordpress.com

  ReplyDelete
 2. अगदी खर आहे कधी कधी अज्ञानातच सुख असत. :)

  ReplyDelete
 3. फारच छान !
  मला आवडले ते
  More Information.....

  दिनेश.
  http://www.sarvottam-marathi-vinod.blogspot.com

  ReplyDelete
 4. its true ... अज्ञानातच सुख असत...nice written ..

  ReplyDelete
 5. एका मित्राने काल छान वाक्य सांगितले "अज्ञानात सुख असते हे कळायला ज्ञानी व्हायला लागते". :-)

  ReplyDelete
 6. खरयं ....काही गोष्टी माहित नसतात तेंव्हा माणूस आनंदी असतो. ..

  ReplyDelete
 7. अज्ञान असल्याने आपण काही गोष्टी खूपच धाडसाने करु शकतो ज्या आपण माहिती असल्यावर करत नाही अपयशी होऊ या भीतीने.

  ReplyDelete

Your comment will be published shortly !!!