Friday, February 12, 2010

माय नेम इज 'ब्रँड' ... युवर 'ट्रस्ट'

'चितळे बंधू मिठाईवाले आपले पुण्यातील दुकान बंद करण्याच्या विचारात'... काय, बातमी वाचून उडालात ना? मनात विचारांचे काहुर माजले ना? आता आम्हाला स्वादिष्ट बाकरवडी, आंबा बर्फी, मोदक इ. कोण देणार? पाहुण्यांना पुण्याहून नेतांना काय खाऊ न्यायचा? आपल्या परदेशी ग्राहकाला अस्सल पुणेरी पदार्थ काय खाऊ घालायचा? एक ना हजार प्रश्न. But the good news is ' असे काही होण्याची  काहीच शक्यता नाही'. पण समजा चितळेंनी तसा विचार जरी केला तरी लोक त्यांच्या घरावर मोर्चे नेतील, आंदोलन करायला रस्त्यावर उतरतील, सभा घेतील की, 'थोडे जास्ती पैसे घ्या, पाहिजे असल्यास आपल्या शिस्तीचा बाणा (रांग, टोकण, वेळेवर उघडुन-वेळेत बंद इ.इ.) अजून कडक करा (दुपारी वामकुक्षीसाठी बंद ठेवले तरी चालेल).... पण आमच्या जिभेचे चोचले पुरवा'. This is what a BRAND can do to you.


पण का हो असा 'ब्रँड' तयार करण्यासाठी व्यावसायिकाला जाहिराती(Advertisements),गाजा-वाजा(Publicity), सरकारी नियंत्रण(Permit), फुकट सँपलचे वाटप वगैरे वगैरे इत्यादींची मदत घ्यावी लागते का?
जरा इतिहासात डोकावून बघुयात...


१) भारताने मुक्त-आर्थिक धोरण अवलंबण्याच्या अगोदर(Pre-1991) बऱ्याचशा क्षेत्रांमध्ये उद्योग उभारण्यासाठी किचकट सरकारी जाचातून जावे लागायचे (License Raj). यामुळे कोणी नवीन उद्योजक पुढे यायचा नाही. त्यामुळे त्या क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या एखाद्या कंपनीची मनमानी (Monopoly) चाले. उदा. Hindustan Motors या कंपनीने 1991 अगोदर 20 वर्षांत एकही नवीन चारचाकी Model बाजारात आणले नाही(सर्व जुने Ambassador ग्राहकांच्या माथी मारले). Bajaj Scooter नंबर लागल्यावर प्रत्यक्ष हाती यायला 5-6 वर्षे लागत. दुरध्वनीसंच (Telephone) मिळायलासुद्धा असेच 5-6 वर्षे लागत. पण यांना 'ब्रँड' म्हणता येइल? हि तर लादणुक झाली. म्हणजे असे सुद्धा लादलेले 'ब्रँड' असायचे तर...


२) 1991 मध्ये भारताने आपली अर्थव्यवस्था थोडी नाविलाजाने का होइना खुली केली आणि भराभर परदेशी कंपन्या आपले दुकान भारतात मांडू लागल्या. भक्ष गिळलेल्या अजगराप्रमाणे सुस्तावलेल्या भारतीय कंपन्यांना अचानक खडबडून जागे व्हावे लागले. काहींनी संघटीत होउन सरकारी संरक्षण मागितले (Bombay Club), काहींनी या आव्हानाला सामोरे जायचे ठरवले, काहींनी आपले धंदे बंद केले तर काहींनी आपला धंदा चक्क परदेशी कंपन्यांना विकला. पारले(Parle) ही शितपेयातली (Cold Drinks)नावाजलेली कंपनी. तिने आपले सर्व शितपेयातली ब्रँड (Thums-up, GoldSpot etc) कोका-कोला (Coca-Cola) या परदेशी कंपनीला विकले. Coke या आपल्या ब्रँडला स्पर्धा नको म्हणून कोका-कोलाने पारलेचे 'ब्रँड' मारायचे ठरवले पण Thums-up हा 'ब्रँड' ते काही मारू शकले नाही कारण त्याला असलेली लोकप्रियता! Its the only BRAND in the world which Coke couldnt kill after takeover. आहे कि नाही 'ब्रँड' ची गंमत?


३) बरेचसे 'ब्रँड' मर्यादित काळापर्यंत चालतात पुढे स्पर्धेमुळे त्यांचा टिकाव लागत नाही. अशांना संधीसाधू म्हणता येईल. उदा. DEC-Machines, Fiat etc.


४) वरिल उदाहरणे वस्तू (Products) संदर्भातील आहेत. आता तुम्ही म्हणाल सेवा (Services) क्षेत्रातील ब्रँडचे काय? सेवा क्षेत्रात प्रामुख्याने येणारे उद्योग म्हणजे हवाई-वाहतुक(Airlines) ,माहिती तंत्रज्ञान(IT-Services), पर्यटन(Tourism) वगैरे. सेवा क्षेत्रात सुद्धा ब्रँड असतो पण तो प्रामुख्याने जी व्यक्ती ती सेवा देते आणि जी व्यक्ती ती सेवा घेते या दोघांमधील अद्रुश्य बंधांवर अवलंबून असते. सेवा देणाऱ्याने सेवा दिली पण ती घेणाऱ्याला कशी वाटली यावरच त्याचे ब्रँड-मुल्य ठरते (How the rendered service is perceived, decides the Brand-Value). कसे ते सोदाहरण पाहु.
सिंगापुर एअरलाइन्स त्यांच्या उड्डानादरम्यान(In-Flight) दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल प्रसिद्ध आहे. एकदा सिंगापुर-मुंबई विमानप्रवासा दरम्यान बाजुला एक भारतीय जोडपे आपल्या तान्हुल्या बाळाला घेउन बसले होते. सिंगापुरहून प्रवास सुरू झाला आणि काही वेळाने ते छोटे बाळ रडायला सुरुवात झाली. वेगवेगळ्या उपायांनीसुद्धा त्याचे रडणे काही थांबेना. आजुबाजुचे प्रवासी त्याकडे पाहू लागले. त्या जोडप्यालासुद्धा थोडे बुजल्यासारखे झाले. पण करणार काय? छोटे बाळच ते! त्या जोडप्याची ती अवस्था पाहून सिंगापुर एअरलाइन्सची एक तरुण हवाईसुंदरी जवळ आली आणि आपल्या जराशा तोकड्या आंग्ल भाषेत संवाद साधत बाळाला खेळवू का अशी परवानगी मागू लागली. आईने थोडे हायसे वाटून बाळाला हवाईसुंदरीजवळ दिले. ती बाळाला घेवून आपल्या कक्षाकडे गेली. काही वेळाने बाळ आणि हवाईसुंदरी अगदी हसत हसत आले आणि हवाईसुंदरीने बाळाला बरीचशी खेळनी आणली होती. मला खात्री आहे की ते जोडपे आणि बाकी इतर प्रवासीसुद्धा हवाईसुंदरीच्या या प्रेमळ व्यवहाराने सुखावले असणार आणि अगदी बाळाची सुद्धा अशी काळजी करणाऱ्या सिंगापुर एअरलाइन्सला पसंती देणार. झाले सिंगापुर एअरलाइन्सचे ब्रँडिंग झाले. You dont have to create BRAND, it gets created.५) अमिताभ हा एक असाच ब्रँड (Yes, a person is also a BRAND). 'कुलीच्या' सेटवर झालेल्या अपघाताने म्रुत्युशय्येवर होता. पण लोकांनी त्याच्यासाठी प्रार्थना केल्या, नवस केले, होम-हवन केले आणि त्याला पुन्हा आपल्यात आणले.
आता मला एक सांगा, नामशेष झालेल्या किंवा बाजारातील पत कमी झालेल्या किती 'ब्रँड' नि लोकांचा विश्वास (खरोखरचा) संपादन केलेला असतो आणि तरिही त्यांना बाजारात पत राखायला अपयश आलेले असते?


जर बारकाइने बघितले तर नामशेष झालेल्या 'ब्रँड' नि लोकांचा पाहिजे तितका विश्वास कधीच संपादन केलेला नसतो. तो 'ब्रँड' केवळ एक संधी म्हणून चालत असतो (Opportunistic). जर लोकांचा पाहिजे तितका विश्वास त्यांनी संपादन केलेला असेल तर लोकच तो 'ब्रँड' मरू देणार नाहीत. फार लांब जायला नको 'चितळे', 'Thums-up','सिंगापुर एअरलाइन्स','अमिताभ' ही उदाहरणे बोलकी आहेत. यासाठी एक गुण मात्र त्या व्यावसायिकामध्ये असावा लागतो तो म्हणजे लोकांची 'नस' ओळखण्याचा, ती पकडून ठेवण्याचा, त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य तो मोबदला आणि समाधान देण्याचा. मग तुम्हाला जाहिराती(Advertisements), सरकारी नियंत्रण(Permit), गाजा-वाजा(Publicity), फुकट सँपल यांच्या कुबड्या घ्याव्या लागत नाहीत.


मॅनेजमेंट-गुरू Stephen Covey हेच त्याच्या 'The SPEED of Trust' या पुस्तकात सांगतो.
एकदा का तुमच्या हाती लोकांची नस आली कि मग तुमच्या काळजाचे ठोके ते कधीच चुकू देणार नाहीत.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

3 comments:

 1. आपला ब्लॉग खुप विचारपुर्वक लिहिलेला आहे

  ReplyDelete
 2. Anonymous10:02 AM

  Nice article, I like it.

  ReplyDelete
 3. ब्रँड चे नुकसान हा सुद्धा एका स्वतंत्र ब्लॉग चा विषय होऊ शकतो. Maggi मुळे Nestlé चे नुकसान झालेले आपण आत्ताच पाहीले आहे.
  अशा प्रकारचे नुकसान किंवा मानहानी टाळण्यासाठी काय करावे?
  जेवढा मोठा ब्रँड तेवढी बदनामी जास्त, या उक्तीनुसार मोठ्या ब्रँडस् ने काय काळजी घ्यावी?
  बिजनेस एथिक्स व ब्रँडचे जनमानसातील स्थान याचा परस्परसंबंध नेमका कसा असतो?
  इतिहासात ब्रँड तयार करताना घडलेल्या रंजक घटना कोणकोणत्या?

  इत्यादी विषयांवर वाचायला आवडेल.

  ReplyDelete

Your comment will be published shortly !!!