Wednesday, April 17, 2013

पेटंट (?) बी पेशंट -- भाग १

सचिनला आज जरा क्रिकेटची प्रॅक्टीस करतांना खरचटले. तो थोडासा अडखळतच घरी आला. त्याचा हिरमुसला चेहरा पाहुन आजीला कळले की स्वारीला आज बरे नाहिये. आजीने लगेच चौकशी केली आणि आपला बटवा आणायला सांगितले. बटव्यातील आंबी - हळद काढून त्याच्या जखमेवर लावली आणि निश्चिंत झाल्या.
आजींना जर कळाले कि त्यांनी नुकताच एका पेटंटचा वापर केला आहे आणि त्या बदल्यात त्यांना काही फी (Royalty) हि त्या पेटंट ज्याच्या नावे आहे त्याला द्यावी लागेल तर केवढा गदारोळ होइल ? तरी बरे कि आजीबाईंच्या बटव्यावर अजुनतरी पेटंट कुणाला देण्यात आलेले नाही त्यामुळे आपण त्याचा बिनधास्त वापर करतो.
सर्वोच्य न्यायालयाने नुकतेच 'नोव्हार्टीस' या स्वीस कंपनीला रक्ताच्या कर्करोगावरील औषधाचे (Glivec) पेटंट भारतात नाकारले आणि पुन्हा जागतीक पेटंट आणि भारतीय पेटंट कायदे हा विषय चर्चेत आला.

पेटंटचे महत्त्व

सर आयझॅक न्युटन यांनी कुठेतरी म्हटले आहे 'आपण आपल्या पुर्वजांच्या खांद्यावर चढून हे जग पाहत असतो (We stand on the shoulder of giants).त्यांना म्हणायचे होते कि त्यांच्या अगोदरच्या शास्त्रज्ञांच्या पीढीने मुलुभुत संशोधन करून पाया रचून ठेवला आहे आपण त्याच्या वापर करून पुढे जात असतो. आपल्या संशोधनापायी 'गॅलीलीओ'ला आपले आयुष्य वेचावे लागले (कर्मठ चर्चने शिक्षा केली). लसीकरणाची (vaccination) पद्धत शोधणाऱ्या 'एडवर्ड जेन्नर' याने तो प्रयोग एका छोट्या मुलावर केला होता. तो जर अयशस्वी झाला असता तर त्याची काही गय जगाने केली नसती.एडीसन (ज्याच्या नावे अजुनही पेटंटचा विक्रम आहे) ज्या रेल्वेगाडीत वृत्तपत्र विकत आणि संशोधन करीत त्यात आग लागली होती आणि ते सर्व त्यातून थोडक्यात बचावले होते.

तर असे हे आपले पुर्वज आणि अशा या त्यांनी घेतलेल्या जोखीमा (Risks).त्यांनी जर या जोखीमा घेतल्या नसत्या तर आपण आहोत तेवढे सुखी निश्चीतच नसतो. न्युटनचे वाक्य किती समर्पक आहे.

अशा जोखीमा घेउन मानवजातीच्या भल्यासाठी काम करणाऱ्याचा उचीत गौरव म्हणून त्यांना पेटंट (स्वामित्व हक्क) देण्यात आले तर त्यात खचितच काहीही गैर नाही.या पेटंटचा वापर जर कोणी काही बाजारु-उत्पादनात करत असेल (जसे कि पोलिओसाठी लस) तर त्याचा विक्रीतील उचीत भाग (Royalty) हा त्या संशोधकाला देण्यात यावा या मताला कोणाचीच हरकत नसावी. हे पेटंट म्हणजे त्या संशोधकाच्या बौद्धीक-संपत्तीचे (Intellectual Property) केलेले रक्षण आहे. पेटंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क, लोगो वगैरे हे प्रचलीत हक्क (Rights) रक्षणाची हत्यारे आहेत.त्यांच्या किचकट कायदेविषयक व्याख्येमध्ये न जाता आपण या चर्चेपुरते आपले लक्ष पेटंट वरतीच ठेवु.

पेटंटची पार्श्वभुमी

जगातील पहिले अधिकृत नोंदणी झालेले पेटंट हे इटली मध्ये १५व्या शतकात घेतल्याची नोंद आहे.जगात प्रत्येक देशाचे पेटंट विषयी वेगवेगळे नियम आहेत. त्यांमुळे एखादे संशोधन हे एका देशात जरी पेटंट करून घेतले तरी त्याचे पेटंट हे दुसऱ्यादेशातही दिले जाइल याची काहिच शाश्वती देता येत नाही.यात जागतिक व्यापार संघटनेने (World Trade Organization-WTO) सुसुत्रता आणायचा प्रयत्न केला आहे पण तो पुरेसा नाही.
भारतात १९६५ चा पेटंट कायदा प्रमाण मानला जायचा. यानुसार भारतात फक्त प्रक्रियेसाठीच पेटंट(Process Patent) देण्यात येत, उत्पादनासाठी (Product Patent) नाही.उदा. उसापासून साखर तयार करणे हि झाली प्रक्रिया आणि साखर हे झाले उत्पादन.परंतु आपण जागतिक व्यापार संघटनेचे सदस्य झालो आणि आपल्याला आपले पेटंट विषयक धोरण २००५ पर्यंत बदलणे बंधनकारक ठरले.आता बदललेल्या नियमानुसार भारतात उत्पादनावर सुद्धा पेटंट (Product Patent) घ्यायला मंजुरी आहे. मध्यांतरी कुणीतरी अमेरिकेत आंबी - हळदीच्या औषधी गुणधर्माविषयी पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला. तो भारत सरकारने तेथील कोर्टात हानून पाडला.ते जर पेटंट दिले गेले असते तर भारतात जिथे कुठे आंबी - हळद औषध म्हणून वापरली जाते त्या सर्वांना या पेटंट घेणाऱ्या महाभागाला फी (Royalty) द्यावी लागली असती.कारण जागतिक व्यापार संघटनेच्या नियमावलीनुसार हे पेटंट भारतातही मिळवण्याचा मार्ग त्या महाभागाला सुकर झाला असता.

अमेरिकेतल्या ऍपल (Apple) या कंपनीने आपल्या दुकानातील (Apple-stores) पायऱ्यांच्या (Steps) डिझाइनचेसुद्धा पेटंट घेतलेले आहे. हे कमी म्हणून कि काय आपल्या iPhone या उत्पादनात असलेल्या Round-Edges चे सुद्धा पेटंट त्यांनी घेतल्याचे ऐकिवात आहे.अमेरिकेत अक्षरशः कशाचेही पेटंट घेता येते का असाच प्रश्न पडतो.भारतीय भुखंड, चीन, अफ्रिका अशा देशांत अजुनही बौद्धिक संपत्ती (Intellectual Property)संरक्षणाविषयी तितकिशी जागरुकता नाही त्यामुळे याचे सर्रास उल्लंघन दररोजच होत असते. उदा. रस्त्यांवर विकली जाणारी महागड्या पुस्तकांच्या हलक्या दर्जाच्या पण स्वस्त प्रती (Cover versions) ,पायरेटेड डिजिटल कंटेंट (Softwares, Movies, eBooks, Torrents etc).

असे उल्लंघन अमेरिकेसारख्या पुढारलेल्या देशातसुद्धा होते. डॉ. रॉबर्ट कर्न्स (Robert Kerns) यांचे Intermittent Windshield Wiper हे संशोधन फोर्ड मोटर कंपनीने परस्पर आपल्या मस्टँग (Mustang) या उत्पादनात चोरून वापरले. शेवटी किचकट न्यायालयीन प्रक्रियेनंतर डॉ. कर्न्स यांना न्याय मिळाला पण या सर्व लढाइमध्ये त्यांना आपल्या कुटुंबापासून विभक्त व्हावे लागले.त्यांच्यावरील 'Flash of Genius' हा माहितीपट आवर्जून पाहावा असाच आहे.

फेसबुकचा निर्माता मार्क झुकेरबर्गवर सुद्धा फेसबुक ही संकल्पना एका 'हार्वड-कनेक्शन' या तीन-मित्रांनी मिळुन बनवलेल्या कल्पनेतुन उचलल्याचा आरोप होतो.त्याबद्द्ल त्याला दंडही भरावा लागल्याचे बोलले जाते.याचे फारच सुंदर चित्रण 'Social Network' या हॉलिवुडपटात आहे.पण सर्वच संशोधक केवळ पैसा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवुन संशोधन करत नसतात.ज्या माहितीजालावर (Internet) बसुन तुम्ही हा लेख वाचत आहात, त्याचा जनक 'टीम बर्नर्स ली' हा जीनेव्हा येथील भौतिकशास्त्राच्या प्रयोगशाळेत (CERN laboratory of partical physics) नोकरीला होता.वारंवार लागणारी माहिती कुठेतरी योग्यत्या रुपात साठवता यावी आणि कोठुनही त्याच रुपात दिसावी यासाठी त्याने World Wide Web (WWW) या संकल्पनेला तयार केले ( He wrote the first Web-Server ' CERN httpd' and first Web-Browser 'Lynx' visit: http://info.cern.ch/). जर त्याने त्याचे पेटंट घेतले असते तर संगणकावर माहितीजालातुन येणाऱ्या प्रत्येक Bit साठी आपणाला किंमत (Royalty) मोजावी लागली असती. आपले संशोधन सामान्यापर्यंत पोहोचावे म्हणुनच त्याचे पेटंट न घेतल्याचे 'टीम ली' बोलला. टाइम मॅगॅझीनने त्याचा गौरव केला. ब्रिटनच्या राणीने त्याला मानाचा 'KnightHood' किताब प्रदान केला.तर असे हे संशोधक, असे त्यांचे संशोधन, असे त्यांचे पेटंट !!! पेटंटची ही कहानी औषधनिर्मिती क्षेत्रात (Pharma) कशी लागु होते आणि सामान्य मानसापर्यंत त्याची व्याप्ती कशी येते ते पुढील प्रकरणात पाहु.

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)  

12 comments:

 1. Great post in simple language!

  ReplyDelete
 2. पोस्ट अतिशय माहितीपूर्ण व ओघवत्या शैलीत आहे. त्यामुळे मुद्दाम वाचावं लागत नाही तर वाचनाचा आनंद मिळतोय. खूपच छान.

  ReplyDelete
 3. Shrikant3:27 AM

  Very nice !
  Keep on writing ! :-)

  ReplyDelete
 4. Anonymous7:24 AM

  शून्याचा शोध "आर्यभट्ट" यांनी लावला , त्याचे पेटंट भारताने घेतले तर प्रत्येक बीट आणि बाईट साठी पैसे मोजावे लागतील हे देखील जगणे विसरू नये.

  ReplyDelete
 5. Prashant Vanarase.7:24 AM

  शून्याचा शोध "आर्यभट्ट" यांनी लावला , त्याचे पेटंट भारताने घेतले तर प्रत्येक बीट आणि बाईट साठी पैसे मोजावे लागतील हे देखील जगणे विसरू नये.

  ReplyDelete
 6. Prashant Vanarase.7:26 AM

  शून्याचा शोध "आर्यभट्ट" यांनी लावला , त्याचे पेटंट भारताने घेतले तर प्रत्येक बीट आणि बाईट साठी पैसे मोजावे लागतील हे देखील जगाने विसरू नये.

  ReplyDelete
 7. Very nice. Quite informative and easy for ordinary person to undestand.

  Thanks a lot.. Keep on Writing :)

  ReplyDelete
 8. अतिशय माहितीपूर्ण पोस्ट!

  ReplyDelete
 9. मनोज, VisualTrader, श्रीकांत, देवयाणी, विजय आणि प्रशांत आपल्या प्रतिक्रियांबद्द्ल मनापासुन आभार.

  ReplyDelete
 10. Anonymous11:54 PM

  Well written and informative. Many thanks Yogesh, well done!

  ReplyDelete
 11. Nice!! Very neat!!

  ReplyDelete
 12. Good carry on...mala petan have ahe ....help me ....8055685403

  ReplyDelete

Your comment will be published shortly !!!