Friday, May 19, 2006

गुगल (इ)स्टोरी

जगातले बरेचशे शोध हे 'अपघाताने' लागले आहेत. गुगलही याला तितकेसे अपवाद नाहिये.
खरेतर एक PHD साठी घेतलेला विषय एका मोठ्या व्यवसायचे रुप घेइल हे लॅरी आणि सर्गी (दोघेही गुगलेचे संस्थापक आहेत) यांना स्वप्नात सुद्धा वाटले नसेल.
गुगल जेंव्हा बाजारात आले तेंव्हा अल्टाव्हीस्टा, एक्साइट, याहु हि मंडळी अगोदरच या व्यवसायात होती. गुगल ने वेगळे काय केले असेल तर ते PageRank Algorithm वापरुन, इंटरनेट्वरील शोध (search) ला वेगळे रुप दिले. PageRank मुळे जास्त relevant search results च, आपणास दिसतात. यात लॅरी पेजची संशोधक व्रूत्ती दिसुन येते.
हा प्रोजेक्ट या मंडळींनी नंतर अल्टाव्हीस्टा, एक्साइट, याहु यांना विकण्याचा अयशस्वी प्रयत्नही केला परंतु भविष्य काही वेगळेच घडणारे होते.
हि मंडळी जेंव्हा सावकाऱांकडे (Venture Capitalists) पैसे मागायला गेली तेंव्हा बरेच ठिकाणी निराशाही झाली. ज्या सावकाराने पहिल्यांदा त्यांना पैसे दिले ते हे बघुन कि या मंडळींना MotherBoard, Drives घेण्यासाठी पैसे वापरायचे आहेत, advertiseसाठी नाही. ( कधी कधी तुमचे प्रामाणिक उत्तर काय काय करु शकते त्याचेच हे उदाहरण. त्या सावकाराने $१,००,००० ची मदत त्यांना दिली.)
पुढे गुगलची यशोगाथा सर्वश्रुत आहेच.
गुगलवर अजुन सविस्तर माहिती क्रमशः

Thursday, September 09, 2004

कहानी लंडनच्या आजीबाईंची

आजीबाई बनारसे ,लंडन ' एवढ्या त्रोटक पत्यावर पत्र पोहोचेल असे वाटते का ? नाहि ना ? पण काही व्यक्ति आपल्या कर्तुत्वाचा झेंडा अगदी लंडनपार लावतात. आजीबाई बनारसे त्यातील एक.
विदर्भातील 'चौंडी ' या खेडेगावात आजीबाईंचा जन्म झाला. लहानपणीच आई , वडिल वारले. पहिले लग्न झाले. ५ मुली झाल्या. यजमान वारले. प्रापंचीक गरज म्हणुन दुसरे लग्न केले आणि काहिशा अपघातानेच त्या लंडनला पोहोचल्या.
लंडनमध्ये दुसर्‍या यजमानांचे लवकरच निधन झाले. आजीबाई अक्षरश: रस्त्यावर आल्या परंतु नियतीच्या मनात काहि औरच होते.
परिस्थितिचे चटके खात-खात त्या तेथिल विख्यात 'लॅन्ड लेडि' बनल्या. भरभराटीच्या काळात त्यांच्या नावावर लंडनमध्ये १४ इमारती होत्या. लंडनमधील हिंदू साई मंदिर , महाराष्ट्र मंड्ळ हे आजीबाईंची देन आहे.
एवढे कर्तुत्व गाजवणार्‍या आजी 'निरक्षर' होत्या यावर कुणाचा विश्वासहि बसणार नाही.
त्यांच्या जिवनावर 'कहानी लंडनच्या आजीबाईंची' हे पुस्तक 'राजहंस प्रकाशन' ने प्रकाशित केले आहे. ते फ़ारच वाचनिय आहे.
आजींची संक्षिप्त कहानी खालील संकेतस्थळावर आहे.
http://tulipsintwilght.wordpress.com/2007/08/10/aajibai-banarse/

(माझ्या या ब्लॉग-पोस्टला बऱ्याच भेटी होतांना दिसत आहेत. आपणास अजुनही बरेच काही वाचनीय माझ्या मनमोकळं या ब्लॉगवर सापडु शकेल.)

(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)