"जरा थांबा, तुम्ही शाकाहारी म्हणवता आणि जे वांग्याचे भरीत खात आहात त्यात एका सजीवाचा जीव जाणिवपुर्वक मिसळला आहे" असे जर कोणी तुम्हाला सांगितले तर तुम्हाला काय वाटेल?
होय असेच काहिसे होऊ घातले आहे सध्याच्या काही दिवसांपासुन. आता तुम्ही म्हणाल हे कोडयातले बोलणे सोडा'. खरे असे आहे कि, हा कोडयात पाडण्यासारखाच मुद्दा आहे आणि तो 'उचलली जीभ आणि लावली टाळाला' असे म्हणुन टाळता येणारासुद्धा नाही.
मागील बरेच दिवसांपासून पेपरामध्ये 'बीटी' वांग्यांबर बंदी घालण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलनाच्या बातम्या झळकत आहेत. आपले पर्यावरण मंत्री श्री. जयराम रमेश (IIT-MIT alumnus) त्यामुळे पेचात पडले आहेत. परंतु हे बीटी वांगे आहे काय आणि त्यालाच एवढा विरोध का यासाठी थोडी वैज्ञानिक पार्श्वभुमी तयार करुयात.
ज्युरॅसिक पार्क मधील विचार करायला लावणारी 4-दृश्ये खालील क्लिप मध्ये आहे. वाचकांना आवाहन कि ही क्लिप जरुर बघावी आणि त्यातील गणितज्ञ डॉ. माल्कम यांची वाक्ये काळजीपुर्वक ऐकावी. त्यांचं वाक्य 'Life finds a way' सगळ्यांवर कडी करून जाते.
कोणीही म्हणेल कि, ज्युरॅसिक पार्क हि एक वैज्ञानिक कल्पना (Science Fiction-SciFi) होती. म्हणून काय प्रत्येक शोध, संशोधन, प्रकल्प यांकडे असे संशयाने पहायचे काय?
उदा. खालील दाखले हे मानवजातीसाठी उपकारकच ठरले आहेत.
१) लसीकरणामुळे(Immunization) देवी, कॉलरा अशा रोगांचे पृथ्वीतलावरून उच्चाटन झाले आहे.
२) अणु-औषधांमुळे (Nuclear Medicine) कर्करोगावर थोडेतरी नियंत्रण मिळवता आले आहे.
३) विज, फोन, विमान, इंटरनेट अशा शोधांमुळे मानवजात प्रगत (आणि सुखी?) झाली आहे.
४) मुळ पेशी (Stem-cells) मुळे कित्येक अवयव हे कृत्रीमरित्या तयार करता येणार आहेत.
पण कुठलेही शोध, संशोधन, प्रकल्प हे मानवजातीसाठी उपकारक असले तरीही ते निसर्गाशी सुसंगत आहे कि नाही हे प्रमाणित करणारी प्रयोगशाळा (Certifying Laboratory) अजूनतरी पुर्ण अस्तित्वात नाही नाहितर खालील प्रसंग आपणावर ओढावलेच नसते.
१) मुंबईच्या पुरात मिठी-नदी पुन्हा जिवंत झाली, सुनामी मुळे लाखो लोक मृत्यू पावले.
२) समुद्रातील पाण्याची पातळी वाढून काही वर्षांत 'मालदीव' सारखे छोटे देश बुडणार.
३) चीनमध्ये नदीवर बांधलेल्या धरणांमुळे कितीतरी प्रजाती(Species) नष्ट झाल्या आणि आजुबाजुच्या प्रदेशांतील तापमानात वाढ झाली आहे.
४) स्वाइन-फ्लू, बर्ड-फ्लू, चिकनबुनिया सारखे नवीन रोग येत आहेत.
जनुकशास्त्र हे निसर्गाशी सुसंगत कि विसंगत याचे उत्तर कदाचीत आपल्याला पुढची काही शतके मिळुही शकणार नसेल पण एक गोष्ट तितकीच खरी कि ते जर निसर्गाशी विसंगत असेल तर त्याची किंमत आपल्याला नामशेष झालेल्या डायनॉसॉर प्रमाणे चुकवावी लागेल आणि मग मानवानंतर पृथ्वीवर येणारा जीव मानवाला जिवंत करून त्याचे 'क्वाटर्नरी पार्क' ('The present period is called as 'Quaternary Period' according to Geological Timelines.) बनवेल.

कुठल्याही सजीवाच्या निर्मितीचा मुळ आराख़डा(Blue-Prints) हे त्याच्या DNA मध्ये असतो. असे DNA वेगळेकरून त्यापासून सजींवांची निर्मिती करण्याचे वेगवेगळे प्रयोग झाले आहेत. या शास्त्राला जनुकशास्त्र(Genetics) असे नामकरणसुद्धा आहे. बीटी-वांगे हे आहे एक Genetically Modified (GM or Transgenic) वांग्याचे वाण (Seed). बीटी-कृमी (Bacillus Thuringiensis Worm) हा एक शेत-मातीत आढळणारा कृमी आहे. त्यात शेत-पिकाचे किडीपासून संरक्षण करणारा जनुक(Genes) असतो. नेमका हाच जनुक वेगळाकरुन तो मुळ वांग्याच्या वाणात(Seed) मिसळून बीटी-वांग्याचे (सुधारीत?) वाण तयार केले आहे एका परदेशी कंपनीने आणि ते एका भारतीय कंपनीमार्फत भारतात विकावयास आणले आहे. परदेशी कंपनीचा दावा आहे कि, किडे-अळी असे पिकांना उपद्रवी जीव जेंव्हा बीटी-जनुका जवळ जातात तेंव्हा हे जनुक एक विषारी द्रव बाहेर सोडते त्यामुळे किडे-अळी असे जीव पिकांजवळ येत नाहीत आणि पिकांचे आपोआप संरक्षण होते. याउलट काही तज्ञ्यांचा दावा आहे कि, बीटी-जनुकाचा अंश खाणाऱ्याच्या शरीरात गेल्यामुळे त्याच्या शरीरावर प्रतिकुल परिणाम जसे वंधत्व (Infertility), ऍलर्जी, कर्करोग(Cancer) होऊ शकतात.
दावे-प्रतिदावे काहीही असोत पण इथे एक नैतिक(Ethical) प्रश्न असा उठतो कि, 'निसर्गाने निर्मिती केलेल्या अशा वाणात बदल करून आपल्याला पाहिजे ते वाण तयार करण्याचा मानवाला अधिकार आहे काय?' उदया मानसाच्या जनुकात, प्राण्यांचे जनुक मिसळून तुम्ही एक वेगळीच जमात(Breed) तयार कराल आणि काय माहित पुढे तीच जमात मानसाच्या अस्तित्वावर घाला आणेल? प्रश्न काल्पनिक असला तरीही शक्यतांपासून दुर नाही.
वाघ आणि सिंहाच्या संकरातून (Cross-Breeding) तयार केलेल्या LIGER (Lion + Tiger) चे चित्र खाली पहा.
आता याला काही आधार मिळतो का ते पाहु. 1993 साली 'स्टीवन स्पिलबर्ग' या द्रष्टया दिग्दर्शकाने 'ज्युरॅसिक पार्क' हा अफलातून चित्रपट आणला. त्याचे कथानक थोडक्यात असे आहे कि, जॉन हॅमंड हे 650 लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या 'डायनॉसॉर' या भयानक प्राण्यांचे DNA मिळवतात.
सापडलेल्या DNA मध्ये बेडकाचे DNA मिसळून आणि जनुकशास्त्र(Genetics) वापरून डायनॉसॉर बनवले जातात. हे डायनॉसॉर ते एका पार्कमध्ये ठेवतात तेच हे 'ज्युरॅसिक पार्क'.हा पार्क त्यांना जगातील सर्वांना बघायला खुला करायचा असतो. या पार्कची शहनिशा करून त्यावर शिक्कामोर्तब(Endorsement) करण्यासाठी ते 3-शास्त्रज्ञ (1-गणितज्ञ, 2-जीवशास्त्रज्ञ) आणि 1-विमातज्ञ्याला पाचारण करतात
पार्कमधील डायनॉसॉरांची संख्या हि गुणसुत्रे (chromosomes) नियंत्रित करून मर्यादित ठेवलेली असते यात पार्कमध्ये फक्त स्रिलींगी (female) डायनॉसॉर असतील याची काळजी घेतली जाते. पार्कला भेट देणाऱ्यांपैकी एक 'डॉ. माल्कम' शंका उपस्थित करतात कि,"उत्क्रांतीवादाने आपल्याला हे शिकवले आहे कि जीवण कधीही बंदिस्त राहू शकत नाही. ते आपला मार्ग सापडून राहते ('Life finds a way')". घडतेही अगदी तसेच. बेडकाचे DNA (amphibian DNA) आपले गुणधर्म बदलतात आणि डायनॉसॉरांचे प्रजनन (breeding) व्हायला लागते. याची कल्पना ज्युरॅसिक पार्क मधील कुनाही शास्त्रज्ञ्याला अगोदर आलेली नसते.
शास्त्रज्ञांच्या पार्क भेटी दरम्यान, पार्कचा विद्युतपुरवठा एक फुटीर-माणुस खंडीत करतो आणि हे 'डायनॉसॉर' मोकळे होउन पार्कमध्ये फिरायला आलेल्या शास्त्रज्ञांच्या मागे लागतात. शास्त्रज्ञ आणि लहान मुले कसाबसा आपला जीव वाचवतात आणि अर्थातच पार्क चालू करू नये या मतापर्यंत शास्त्रज्ञ आणि प्रेक्षक सगळेच येतात ('स्टीवन स्पिलबर्ग'ची खरी कमाल यात आहे.)
दावे-प्रतिदावे काहीही असोत पण इथे एक नैतिक(Ethical) प्रश्न असा उठतो कि, 'निसर्गाने निर्मिती केलेल्या अशा वाणात बदल करून आपल्याला पाहिजे ते वाण तयार करण्याचा मानवाला अधिकार आहे काय?' उदया मानसाच्या जनुकात, प्राण्यांचे जनुक मिसळून तुम्ही एक वेगळीच जमात(Breed) तयार कराल आणि काय माहित पुढे तीच जमात मानसाच्या अस्तित्वावर घाला आणेल? प्रश्न काल्पनिक असला तरीही शक्यतांपासून दुर नाही.
वाघ आणि सिंहाच्या संकरातून (Cross-Breeding) तयार केलेल्या LIGER (Lion + Tiger) चे चित्र खाली पहा.
आता याला काही आधार मिळतो का ते पाहु. 1993 साली 'स्टीवन स्पिलबर्ग' या द्रष्टया दिग्दर्शकाने 'ज्युरॅसिक पार्क' हा अफलातून चित्रपट आणला. त्याचे कथानक थोडक्यात असे आहे कि, जॉन हॅमंड हे 650 लाख वर्षांपुर्वी पृथ्वीवरून नामशेष झालेल्या 'डायनॉसॉर' या भयानक प्राण्यांचे DNA मिळवतात.
सापडलेल्या DNA मध्ये बेडकाचे DNA मिसळून आणि जनुकशास्त्र(Genetics) वापरून डायनॉसॉर बनवले जातात. हे डायनॉसॉर ते एका पार्कमध्ये ठेवतात तेच हे 'ज्युरॅसिक पार्क'.हा पार्क त्यांना जगातील सर्वांना बघायला खुला करायचा असतो. या पार्कची शहनिशा करून त्यावर शिक्कामोर्तब(Endorsement) करण्यासाठी ते 3-शास्त्रज्ञ (1-गणितज्ञ, 2-जीवशास्त्रज्ञ) आणि 1-विमातज्ञ्याला पाचारण करतात
पार्कमधील डायनॉसॉरांची संख्या हि गुणसुत्रे (chromosomes) नियंत्रित करून मर्यादित ठेवलेली असते यात पार्कमध्ये फक्त स्रिलींगी (female) डायनॉसॉर असतील याची काळजी घेतली जाते. पार्कला भेट देणाऱ्यांपैकी एक 'डॉ. माल्कम' शंका उपस्थित करतात कि,"उत्क्रांतीवादाने आपल्याला हे शिकवले आहे कि जीवण कधीही बंदिस्त राहू शकत नाही. ते आपला मार्ग सापडून राहते ('Life finds a way')". घडतेही अगदी तसेच. बेडकाचे DNA (amphibian DNA) आपले गुणधर्म बदलतात आणि डायनॉसॉरांचे प्रजनन (breeding) व्हायला लागते. याची कल्पना ज्युरॅसिक पार्क मधील कुनाही शास्त्रज्ञ्याला अगोदर आलेली नसते.
शास्त्रज्ञांच्या पार्क भेटी दरम्यान, पार्कचा विद्युतपुरवठा एक फुटीर-माणुस खंडीत करतो आणि हे 'डायनॉसॉर' मोकळे होउन पार्कमध्ये फिरायला आलेल्या शास्त्रज्ञांच्या मागे लागतात. शास्त्रज्ञ आणि लहान मुले कसाबसा आपला जीव वाचवतात आणि अर्थातच पार्क चालू करू नये या मतापर्यंत शास्त्रज्ञ आणि प्रेक्षक सगळेच येतात ('स्टीवन स्पिलबर्ग'ची खरी कमाल यात आहे.)
ज्युरॅसिक पार्क मधील विचार करायला लावणारी 4-दृश्ये खालील क्लिप मध्ये आहे. वाचकांना आवाहन कि ही क्लिप जरुर बघावी आणि त्यातील गणितज्ञ डॉ. माल्कम यांची वाक्ये काळजीपुर्वक ऐकावी. त्यांचं वाक्य 'Life finds a way' सगळ्यांवर कडी करून जाते.
कोणीही म्हणेल कि, ज्युरॅसिक पार्क हि एक वैज्ञानिक कल्पना (Science Fiction-SciFi) होती. म्हणून काय प्रत्येक शोध, संशोधन, प्रकल्प यांकडे असे संशयाने पहायचे काय?
उदा. खालील दाखले हे मानवजातीसाठी उपकारकच ठरले आहेत.
१) लसीकरणामुळे(Immunization) देवी, कॉलरा अशा रोगांचे पृथ्वीतलावरून उच्चाटन झाले आहे.
२) अणु-औषधांमुळे (Nuclear Medicine) कर्करोगावर थोडेतरी नियंत्रण मिळवता आले आहे.
३) विज, फोन, विमान, इंटरनेट अशा शोधांमुळे मानवजात प्रगत (आणि सुखी?) झाली आहे.
४) मुळ पेशी (Stem-cells) मुळे कित्येक अवयव हे कृत्रीमरित्या तयार करता येणार आहेत.
पण कुठलेही शोध, संशोधन, प्रकल्प हे मानवजातीसाठी उपकारक असले तरीही ते निसर्गाशी सुसंगत आहे कि नाही हे प्रमाणित करणारी प्रयोगशाळा (Certifying Laboratory) अजूनतरी पुर्ण अस्तित्वात नाही नाहितर खालील प्रसंग आपणावर ओढावलेच नसते.
१) मुंबईच्या पुरात मिठी-नदी पुन्हा जिवंत झाली, सुनामी मुळे लाखो लोक मृत्यू पावले.
२) समुद्रातील पाण्याची पातळी वाढून काही वर्षांत 'मालदीव' सारखे छोटे देश बुडणार.
३) चीनमध्ये नदीवर बांधलेल्या धरणांमुळे कितीतरी प्रजाती(Species) नष्ट झाल्या आणि आजुबाजुच्या प्रदेशांतील तापमानात वाढ झाली आहे.
४) स्वाइन-फ्लू, बर्ड-फ्लू, चिकनबुनिया सारखे नवीन रोग येत आहेत.
जनुकशास्त्र हे निसर्गाशी सुसंगत कि विसंगत याचे उत्तर कदाचीत आपल्याला पुढची काही शतके मिळुही शकणार नसेल पण एक गोष्ट तितकीच खरी कि ते जर निसर्गाशी विसंगत असेल तर त्याची किंमत आपल्याला नामशेष झालेल्या डायनॉसॉर प्रमाणे चुकवावी लागेल आणि मग मानवानंतर पृथ्वीवर येणारा जीव मानवाला जिवंत करून त्याचे 'क्वाटर्नरी पार्क' ('The present period is called as 'Quaternary Period' according to Geological Timelines.) बनवेल.
(क्वाटर्नरी पार्कचे कल्पनाचित्र)
(वाचकांना विनंती :- आपल्या प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका.)

masatach....
ReplyDeletevichar karayala lavanara...
Sundar lekh! Vicharanna vegalich disha denara
ReplyDeleteSahi...Chan
ReplyDeleteअभ्यासपूर्वक लिहिलंय, खूपच छान! बी. टी. वांग्याची ही बाजूही लोकांसमोर येणे आवश्यक आहे.
ReplyDeleteअतिशय सुरेख लेख. मुद्देसूद मांडणी. आवडला..
ReplyDeleteमनिष, परेश, स्वाती, डीडी आणि हेरंब आपल्या प्रतिक्रियांबद्द्ल मन: पुर्वक आभार!!!
ReplyDeleteYogesh,
ReplyDeleteVery well written post. Thought provoking. I have read a lot about this subject but never found one which did it in such a simple and entertaining way. I wish I can read all of your posts...
Paresh Yadav
Very interesting !!!
ReplyDeleteपरेश, विद्या, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल मनापासुन धन्यवाद!!!
ReplyDeleteLAI BHARI ...
ReplyDeleteBUT NOBODY CAN NOT CONTROL ALL THIS.
LIFE FINDS A WAY
अतुल, तु लिहिलेल्यात बरेच तथ्य आहे."Life finds a way" या वाक्याप्रमाणे चांगल्या किंवा वाईट गोष्टी आपल्या रस्ता सापडतील.
ReplyDeleteकृत्रिम जीवाणुनिर्मितीत डॉ. क्रेग यांना यश मिळाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
ReplyDeleteलोकसत्ता मध्ये आलेले हे वृत्त वाचा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=71689:2010-05-21-17-23-56&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104
लोकसत्ता (रवी. ३० मे २०१०) मध्ये लिहिलेला 'जिवात जीव!' हा लेख
ReplyDeletehttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=73184:2010-05-28-12-41-53&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117#JOSC_TOP
लोकसत्ता (रवी. ३० मे २०१०) मध्ये लिहिलेला ''ज्युरासिक पार्क'चे ब्रह्मांड' हा लेख वाचा
ReplyDeletehttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=73183:2010-05-28-12-38-12&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117
व्यूह-चक्र : महिलेच्या कर्कपेशींची ‘हेला’वणारी कहाणी
ReplyDeletehttp://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=115893:2010-11-19-15-46-17&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10
डॉ. तारक काटे यांनी नुकताच 'लोकसत्ता' मध्ये "जनुक संस्कारित पिकांचे धोके" हा उतम लेख लिहिला आहे. URL :- http://www.loksatta.com/sampadkiya-news/dangers-of-genetically-modified-crops-143827/
ReplyDeleteतुमचा लेख आवडला. सोप्या भाषेत पण कोणत्याही सुजाण व्यक्तीला विचार करायला लावणारा. विज्ञानाने विविध संशोनाद्वारे व तंत्र निर्मितीद्वारे मानवाचे जीवन सुसह्य केले यात शंकाच नाही. पण जेव्हा हाच मानव विज्ञानाचाच उपयोग करून निसर्गावर मात करू पाहतो व सुख्लोळूप्तेच्या मागे लागून विवेकशून्य होतो तेव्हा हेच विज्ञानाचे शस्त्र उलटू शकते. त्याचे परिणाम आपण आज जागतिक तापमान वाढ व हवामान बदलाच्या स्वरुपात अनुभवत आहोत. त्यामुळे तुम्ही मांडलेला नैतिकतेचा मुद्दा अग्रनीवर येतो.
ReplyDeletebharich...
ReplyDeleteIt was really informative and interesting inforamtion.. thanks yogesh
ReplyDeleteThis is really informative and interesting information.
ReplyDeleteभारत सरकारच्या अन्नसुरक्षा विधेयकामुळे जी.एम. बियाणांची वाट मोकळी होइल असा फारच महत्त्वाचा आणि दुर्लक्षित मुद्दा 'सइ हलदुले' यांनी खालील लेखात उपस्थित केला आहे.
ReplyDeleteURL - http://www.loksatta.com/vishesh-news/politics-of-gm-crop-behind-food-security-bill-186691/
बांग्लादेशाचे जी. एम. वांग्याचे वाण आपल्या देशात कधी घुसखोरी करेल याचा काही नेम नाही. वाचा http://www.thehindubusinessline.com/opinion/beware-of-bangladeshs-bt-brinjal/article5326425.ece
ReplyDeleteGood insights. Great! It feels good to read such enriched articles in Marathi ... Keep up the good work! Yogesh... Kudos
ReplyDelete@Abhishek, Thanks for your visit to the blog-post and words of appreciation. Keep visiting. Regards,
ReplyDeleteVery good Yogesh!! Interesting!!
ReplyDeleteमस्तच योगेश सर,
ReplyDeleteअभ्यास क्रमात अश्या गोष्टी असायला ह्व्यात.
अश्या माहितीचा उपयोग आयुष्याच्या वेग वेगळ्या वळणावर फार उपयोगी येतो.
@Nitin,@Atul, Many thanks for your encouraging comments !!!
ReplyDeleteSunder ani Mahitipurna lekh. Dhanywad Yogesh
ReplyDeleteप्राण्यांच्या अथवा मानवाच्या पेशीत बदल करण्यासाठी ‘क्रिस्पर’ नावाचं तंत्र वापरलं जातं त्यावर आधारित लेख 'सृष्टीच्या अंताची सुरवात!' : http://www.esakal.com/saptarang/marathi-news-sakal-saptranga-esakal-sundeep-waslekar-78247
ReplyDeleteYogesh sir, ajach sandhyakali jhalelya apalya charchanmadhye majha mudda hach hota ki pragati nisarga sangat havi ... mi phakta ayam ha wegala shabda mandala ... lekh kharach atishay sundar aahe ani .. manavani pragati kartana nisarga sangat karavi he aple matashi mi sahamat aahe
ReplyDelete